कारागृहातून पळून गेलेला आरोपी अजिंक्य टेकाळे अखेर सापडला !

 
कारागृहातून पळून गेलेला आरोपी अजिंक्य टेकाळे अखेर सापडला !

उस्मानाबाद - पोलिसांच्या हातावर तुरी देऊन उस्मानाबाद जिल्हा तात्पुरत्या कारागृहातून  पलायन केलेला  आरोपी अजिंक्य टेकाळे हा शिंगोली येथे सापडला असून, पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या आहेत.

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर दहा महिन्यापूर्वी पाडोळी येथे खुनी हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे  हा आज दुपारी जिजामाता मुलींचे वसतीगृह, उस्मानाबाद या तात्पुरत्या कारागृहातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. त्यानंतर त्याचा गुन्हे अन्वेषण विभाग, आनंदनगर पोलीस, शिरढोण पोलीस शोध घेत असताना, सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता शिंगोली येथील हनुमान मंदिरजवळ त्यास ताब्यात घेण्यात आले.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला करणारा आरोपी जेलमधून पळाला

नेमके काय घडले ? 
शिराढोण पो.ठा. गु.र.क्र. 146 / 2019 भा.दं.सं. कलम-307 या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी- अजिंक्य मधुकर टेकाळे, रा. पाडोळी, ता. कळंब हा उस्मानाबाद कारागृहात होता. त्यास वैद्यकीय उपचार- परिक्षणकामी दि. 14.08.2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे दाखल केले होते. उपचारानंतर आज दि. 17.08.2020 रोजी त्याची मुक्तता झाल्याने पोलीस मुख्यालयातील पोना- लक्ष्मण धोत्रीकर त्यास कोविड- 19 संबंधी उभारलेल्या जिजामाता मुलींचे वसतीगृह, उस्मानाबाद या तात्पुरत्या कारागृहात दाखल करत होते. दरम्यान ही दाखल प्रक्रीया सुरु असतांना अजिंक्य टेकाळे हा पोना- लक्ष्मण धोत्रीकर यांच्या हातास झटका देउन पळून गेला होता. 

From around the web