Header Ads

उमरगा : ट्रकची कारला धडक, एक जखमी उमरगा: ट्रक क्र. एम.एच. 25 यू 1064 च्या अज्ञात चालकाने दि. 12.07.2020 रोजी रात्री 09.00 वा. सु. मुळज मोड येथील पर्यायीमार्गाने जात असलेल्या कारला धडक दिली. या अपघातात कारमधील प्रभाकर शामलिंग बिराजदार, वय 59 वर्षे, रा. मलंग प्लॉट, उमरगा यांच्या डोक्यास गंभीर मार लागुन त्यांचा उजवा पाय मोडला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन ट्रकसह निघून गेला. अशा मजकुराच्या कार चालक- संभाजी तलमोडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा दि. 11.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments