Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखलउमरगा: शेतातील ऊस तोडल्याच्या कारणावरुन मौजे औराद तांडा क्र. 2, ता. उमरगा येथील राठोड कुटूंबीयांतील रतन विठ्ठल राठोड, ललिता, पांडुरंग, सुधाकर, अनिता, गोविंद, भुराबाई राठोड यांच्या गटाचा तांड्यातीलच नातेवाईक- सचिन केजु राठोड, शिलाबाई, निखील, केजु, बबली, नितीन राठोड यांच्या गटाशी दि. 08.08.2020 रोजी 08.00 वा. सु. वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, काठी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 09.08.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.


येरमाळा: लक्षमण क्षिरसागर, लखन नारायण क्षिरसागर, दोघे रा. वाघोली, ता. कळंब हे दि. 08.08.2020 रोजी 21.30 वा. सु. गावातीलच- प्रकाश अनंत कांबळे यांच्या चुलत्यास त्यांच्या घरा समोर धक्काबुक्की करत होते. यावेळी प्रकाश कांबळे यांनी चुलत्याच्या बचावाचा प्रयत्न केला असता नमूद दोघांनी त्यांच्या हातावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या प्रकाश कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.


 लोहारा: ज्ञानेश्वर लक्ष्मण भुजबळ, रा. वडगाव (गांजा), ता. लोहारा यांना दि. 09.08.2020 रोजी 12.30 वा. सु. गावातील शेताच्या बांधावर संतोष कल्लप्पा सारणे यांची गुरे चरत असलेली ज्ञानेश्वर दिसली. याचा जाब त्यांनी तेथे हजर असलेल्या संतोष सारणे यांस विचारला असता त्यांनी ज्ञानेश्वर भुजबळ यांना काठीने मारहाण करुन त्यांच्या हातास चावा घेतला. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर भुजबळ यांच्या फिर्यादीवरुन संतोष सारणे यांच्याविरुध्द गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.

                                                                 

No comments