लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या बड्या अधिकाऱ्यांना अभय

तीन महिने झाले तरी गुन्हे दाखल नाहीत... 

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या  बड्या अधिकाऱ्यांना अभय

उस्मानाबाद - लॉकडाऊनचे  नियम मोडून  पुणे आणि औरंगाबाद वारी करणारे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आणि मुख्य लेखा व  वित्त अधिकारी एस.जी. केंद्रे यांच्यावर तीन महिने झाले तरी गुन्हे दाखल  न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

 जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आणि मुख्य लेखा व  वित्त अधिकारी एस.जी. केंद्रे  यांनी लॉकडाऊनचे नियम मोडून पुणे आणि औरंगाबाद वारी केल्याचे प्रकरण उस्मानाबाद लाइव्हने उघडकीस आणले होते. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. संजय कोलते यांनी करणे दाखवा नोटीस बजावली होती.

त्यानंतर   वरिष्ठांची पूर्व परवनगी न घेता, मुख्यालय सोडणाऱ्या दोन्ही अधिकाऱ्यावर भारतीय साथ नियंत्रण अधिनियम १८९७ व महाराष्ट्र कोविड -२०१९ उपाययोजना नियम २०२० नुसार कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदचे सीईओ डॉ. संजय कोलते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे  एप्रिल महिन्यात केली होती. मात्र तीन महिने झाले तरी या दोन्ही अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यामार्फत गुन्हे दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आणि मुख्य लेखा व  वित्त अधिकारी एस.जी. केंद्रे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते  बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

संबंधित बातम्या 

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या  बड्या अधिकाऱ्यांना अभय

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या  बड्या अधिकाऱ्यांना अभय

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या  बड्या अधिकाऱ्यांना अभय

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या  बड्या अधिकाऱ्यांना अभय

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या झेडपीच्या  बड्या अधिकाऱ्यांना अभय

From around the web