Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखलउस्मानाबाद  -  मौजे वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद येथील जगदंबा धाबा समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ट्रक क्र. जी.जे. 16 एयु 7700 हा अपघातग्रसत ट्रक उभा होता. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी नमूद ट्रकची सात चाके, इंधन टाकी, बॅटरी, टारपोलीन व ट्रकची मुळ कागदत्रे असा एकुण 1,87,000/-रु. चा माल दि. 06.08.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेला.

अशा मजकुराच्या मोहील हितेश लीलाधर, रा. अंकलेश्वर, जि. भरुच, राज्य- गुजरात यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील सुनिल प्लाझा या ईमारतीत असणाऱ्या ‘हिताची व्हाईट लेबल एटीएम सेंटर’ येथील 45,000/-रु. किंमतीच्या ॲमारॉन कंपनीच्या 3 बॅटऱ्या दि. 15.07.2020 रोजी सकाळी 05.10 वा. अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या ईमारत मालक- नवीन बनसोडे, रा. उस्मानाबाद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा दि. 08.08.2020 रोजी नोंदवला आहे.

ढोकी - दत्तात्रय फुटाणे, रा. पळसप, ता. उस्मानाबाद यांनी घराबाहेर ठेवलेली हिरो कंपनीची मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 4467 व शेजारी राहणारे- बालाजी फुटाणे यांच्या कुक्‍कूटपालन शेडमधील टेक्नो मोबाईल फोन हा दि. 07.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या दत्तात्रय फुटाणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दि. 08.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments