Header Ads

भूम : दरोड्यातील वाहन जप्त, एका आरोपीस अटकउस्मानाबाद - भूम तालुक्यातील तांबेवाडी येथे पडलेल्या दरोड्यात वापरण्यात आलेले टाटा झेनॉन वाहन  जप्त करून चालक निशिकांत शिवाजी चांदणे यास पोलिसानी अटक केली आहे. 

 राजु बाबासाहेब मस्तुद, रा. तांबेवाडी शिवार, ता. भुम यांसह बाळासाहेब भागुजी कांबळे हे दोघे दि. 16.08.2020 रोजी 00.15 वा. सु. मौजे तांबेवाडी येथील राजु मस्तुद यांच्या गट क्र. 237 मधील शेतात होते. यावेळी 1) रमेश उध्दव चव्हाण 2) नागेश काळे 3)बिभीषण नाना काळे 4) तोब्या पारधी 5) बापु चव्हाण, सर्व रा. पारधी पिढी, ढोकी, ता. उस्मानाबाद 6) आप्पा सोपान काळे उर्फ मामा 7) कल्याण दत्ता काळे, दोघे रा. कोरेगांव, ता. भुम 8) दिपक अर्जुन माळी, रा. तेर हे आठ जण राजु मस्तुद यांच्या शेतात आले. त्यांनी राजु मस्तुद व बाळासाहेब कांबळे यांना लोखंडी गज, हॉकीस्टीक ने मारहाण करुन राजु मस्तुद यांच्या 45 शेळ्या- बोकड- पिले तसेच घरातील रोख रक्कम 89,600/-रु. सह 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व सॅमसंग ए- 30 मोबाईल फोन असा एकुण 6,02,600/-रु. चा माल जबरीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या राजु मस्तुद यांनी दि. 16.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 8 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 395, 397 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

            सदर गुन्ह्यात तपासात स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दि. 17.08.2020 रोजी गुन्ह्यात वापरलेले टाटा झेनॉन वाहन आरोपी- निशिकांत शिवाजी चांदणे याच्या ताब्यातून जप्त करुन उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. परंडाच्या ताब्यात दिले आहे.

No comments