Header Ads

लोहारा : चोरीस गेलेला मोबाईल फोनसह संशयीत ताब्यात
लोहारा : उमाकांत संजय पनुरे, रा. जेवळी (उ.), ता. लोहारा यांनी दि. 07.07.2020 रोजी 22.00 वा. सु. जेवळी येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज या दुकानात आपला वाहवे (Huawei) पी- 30 प्रो मोबाईल फोन किं.अं. 72,000/-रु. चा चार्जीगला लावला होता. तो मोबाईल व दुकानातील रोख रक्कम 900/- रु. असा एकुण 72,900/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने चोरला होता. यावरुन लोहारा पो.ठा. येथे गु.र.क्र. 152/2020 भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार दाखल होता. 

गुन्हा तपासात सायबर पो.ठा. मार्फत ऑनलाईन शोध घेण्यात आला. त्या माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 04.08.2020 रोजी आरोपी- संतोष ज्ञानोबा पवार, वय 35 वर्षे, रा. तुंगी, ता. औसा यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त केला. तसेच उर्वरीत कार्यवाहीस्तव त्यास पो.ठा. लोहारा च्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यायबर पो.ठा. चे सपोनि- सचिन पंडीत, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments