Header Ads

उस्मानाबाद : कार्यालयीन अभिलेख नष्ट, गुन्हा दाखलउस्मानाबाद -  पंचायत समिती कार्यालय, उस्मानाबाद येथील कनिष्ठ सहायक- नेताजी सहदेव कांबळे यांनी त्यांच्या ताब्यातील शासकीय अभिलेख जून- 2015 ते जून- 2016 या कालावधीत अवैधपणे नष्ट केला. परिणामी माहिती अधिकार कायदा अंतर्गत माहिती पुरवण्यास अडचणी निर्माण झाल्या. अशा मजकुराच्या पंचायत समिती येथील वरिष्ठ सहायक- सचिन शामराज यांनी दि. 11.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम कलम- 8, 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण

उस्मानाबाद - एक 16 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) गावातीलच तरुणाने दि. 08.08.2020 रोजी विवाहाचे आमिष दाखवून तीच्या घरासमोरुन अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 11.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363, 366 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

उस्मानाबाद (ग्रा.): मौजे कायापुर, ता. उस्मानाबाद येथील बापू बंडा कांबळे यांच्या शेतातील पावसाचे पाणी शेजारील शेतात जात होते. यावरुन दि. 22.07.2020 रोजी कांबळे व राख कुटूंबीयांत संघर्ष झाला. यात जयश्री राख, फुलचंद राख, अक्षय राख, मुक्ताबाई राख यांनी बापू बंडा कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बापू कांबळे यांनी दि. 12.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 506, 34 सह ॲट्रॉसीटी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments