Header Ads

परंडा : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारावर गुन्हा दाखल परंडा: सुरेश सावता माळी- बनसोडे, वय 50 वर्षे, रा. अंतरगाव, ता. भुम यांनी काही महिन्यांपुर्वी भारत बब्रुवान गवारे, रा. जवळा (नि.), ता. पंरडा यांच्या कडून खाजगी व्याजाने कर्ज घेतले होते. त्या कर्ज- व्याजाच्या वसुलीकरीता भारत गवारे व त्यांची सहकारी- आशाबाई हे दोघे सुरेश माळी यांना उचलून नेन्याची धमकी प्रत्यक्षात तसेच मोबाईल फोनद्वारे देत होते. त्यांच्या या त्रासास कंटाळून सुरेश माळी यांनी दि. 05.08.2020 रोजी 11.00 वा. सु. शेतातील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सुजीत सुरेश माळी- बनसोडे (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 08.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments