Header Ads

परंडा: जुगार विरोधी कारवाया
पोलीस ठाणे, परंडा: जुगार अड्डा चालू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पो.ठा. परंडाच्या पथकाने दि. 08.08.2020 रोजी 13.45 वा. सु. मौजे वाकडी शिवारातील विलास पाटील यांच्या शेतातील पत्रा शेड मागे छापा टाकला. यावेळी 1)विजय ढगे 2)सागर खळदकर 3)आप्पा कांबळे 4)किशोर सेनवाल 5)पोपट उकरडे 6)कमलाकर जमादार 7)हनुमंदत शिंदे 8)सिध्देश्वर चांदणे 9)आण्णासाहेब खेडकर 10)विजय गीराम, सर्व रा. बार्शी हे सर्वजण तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रक्कम 8,240/-रु. व 3 मोटारसायकल, 1 इंडीका कारसह आढळले. यावरुन पथकाने ते साहित्य, रक्कम व वाहने जप्त करुन वरील सर्वांविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): पारधी पिढी, उस्मानाबाद येथे जुगार अड्डा चालू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकाने दि. 09.08.2020 रोजी 13.30 वा. सु. छापा मारला. यावेळी मुकेश देडे यांच्या घरा समोर 1) शकील शेख 2) मिनाज शेख 3) राहुल भांडवले 4) टिल्या पवार व अन्य दोघे तरुण असे सहा जण तिरट जुगार खेळत असतांना आढळले. यावरुन पथकाने घटनास्थळावरील जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 3,130/-रु. जप्त करुन वरील सर्वांविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

पोलीस ठाणे, मुरुम: विजय उध्दव गायकवाड, रा. दाळींब, ता. उमरगा हा दि. 08.08.2020 रोजी मौजे दाळींब येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 20 लि. शिंदी (साहित्यासह किं.अं. 1,200/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द म.दा.का. कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments