Header Ads

कळंब : 2 गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी अटकेत
कळंब -  पो.ठा. कळंब येथे दाखल असलेल्या चोरी व रस्ता अपघात अशा दोन गुन्ह्यात पोलीसांना तपासकामी आरोपी- रुपेश रविंद्र काळे उर्फ पिल्यो, वय 40 वर्षे, रा. मस्सा, ता. कळंब हा पाहिजे होता. पोलीसांनी त्याच्या शोधार्थ वेळोवेळी पथके पाठवली होती परंतू तो मिळुन येत नव्हता. त्याची गुप्त बातमीदारामार्फत  खात्रीशीर बातमी मिळाल्याने था.गु.शा. च्या पोहेकॉ- रोकडे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, डुरंग सावंत यांच्या पथकाने आज दि. 05.08.2020 रोजी त्यास ताब्यात घेउन कळंब पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाया

 बेंबळी: सुनिल कदम, सतिश इंगळे, दोघे रा. आंबेवाडी, ता. उस्मानाबाद हे दोघे आज        दि. 05.08.2020 रोजी मौजे आंबेवाडी येथील चौकात विशाल पानस्टॉल मध्ये विनापरवाना विक्रीसाठी देशी दारुच्या 180 मि.ली. च्या 13 बाटल्या किं.अं. 676/-रु. बाळगले असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, मुरुम: महेमुदसाब शेख, रा. बेळंब, ता. उमरगा हे आज दि. 05.08.2020 रोजी मौजे बेळंब येथील बस थांब्या मागील एका पानटपरी जवळ विनापरवाना विक्रीसाठी देशी दारुच्या 180 मि.ली. च्या 19 बाटल्या किं.अं. 988/-रु. बाळगले असतांना पो.ठा. मुरुम च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, उमरगा: अब्दुल रशीद शेख, रा. येळी, ता. उमरगा हे आज दि. 05.08.2020 रोजी मौजे येळी- चिंचोली रस्त्यालगत 19 लि. अवैध गावठी दारु किं.अं. 975/-रु. विक्रीसाठी बाळगली असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळले.

वरील प्रकरणांत पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द म.दा.का. कलम- 65 (ई) नुसार 3 स्वतंत्र गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments