Header Ads

उस्मानाबाद : एटीएम सेंटर मधील चोरीच्या 3 बॅटऱ्या जप्त, महिला आरोपी ताब्यात

 उस्मानाबाद -  शहरातील सुनिल प्लाझा या ईमारतीत असणाऱ्या ‘हिताची व्हाईट लेबल एटीएम सेंटर’ येथील 45,000/-रु. किंमतीच्या ॲमारॉन कंपनीच्या 3 बॅटऱ्या दि. 15.07.2020 रोजी सकाळी 05.10 वा. अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. यावरुन आनंदनगर पो.ठा. येथे गु.र.क्र. 213/2020 भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

गुन्हा तपासात खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 14.08.2020 रोजी महिला आरोपी- महादेवी जालिंदर जाधव, वय 35 वर्षे, रा. साठेनगर, उस्मानाबाद हिस ताब्यात घेउन तीच्या ताब्यातून नमूद तीन बॅटऱ्या जप्त केल्या. तसेच उर्वरीत कार्यवाहीस्तव तीस पो.ठा. आनंदनगर च्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्था.गु.शा. चे पो.नि. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे व महिला पोकॉ- सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

No comments