Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 51 छापे


उस्मानाबाद -  पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने दि.06.08.2020 रोजी अवैध मद्य विरोधात विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 51 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा 6,430 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 515 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 221 बाटल्या, विदेशी दारुच्या 31 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 3,86,688 ₹ आहे. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यात म.दा.का. अंतर्गत 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


पो.ठा. उस्मानाबाद (श.): रेश्मा गोविंद काळे व लैलाबाई शाम चव्हाण, दोघी रा. उस्मानाबाद या साठे नगर पारधी पिढी येथील गायरानात गावठी दारु निर्मीतीचा 2,800 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 5 लि. (साहित्यासह एकुण किं.अं. 1,73,120/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

कोमल सुरेश पवार, रा. जुना बसडेपो मागे, उस्मानाबाद या उस्मानाबाद येथील जमीर विटभट्टी लगत 10 लि. गावठी दारु (किं.अं. 850/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

मंजुळा मोतीराम पवार, रा. इंदीरानगर, उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरा समोर 30 लि. गावठी दारु (किं.अं. 2,200/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.पो.ठा. ढोकी: 1)सरदार गुलाब काळे 2)बापु बबरु शिंदे 3)सायबाबाई भिमा काळे 4)लालीबाई आत्मा पवार चौघे रा. दत्तनगर पारधी पिढी, ढोकी, ता. उस्मानाबाद हे आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत गावठी दारु निर्मीतीचा 1,500 लि. द्रवपदार्थ (साहित्यासह एकुण किं.अं. 37,500/-रु.) बाळगले असतांना आढळले.

पो.ठा. वाशी: 1)शारदाबाई बप्पा काळे 2)शारदाबाई अरुण काळे 3)विलास देवराव काळे, तीघे रा. सरमकुंडी, ता. वाशी हे आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत गावठी दारु निर्मीतीचा 800 लि. द्रवपदार्थ व 135 लि. गावठी दारु (साहित्यासह एकुण किं.अं. 68,300/-रु.) बाळगले असतांना आढळले.

अतुल महादेव कोकाटे, निपाणी, ता. भुम हा मौजे निपाणी शिवारातील ‘हॉटेल शिवराज’ जवळ देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 572/-रु.) बाळगला असतांना आढळला.

बाळु त्रिंबक शिंदे, रा. बोरगांव (धं.), ता. कळंब हा आपल्या राहत्या घरा समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 750/-रु.) बाळगला असतांना आढळला.

काकुबाई बन्शी शिंदे, रा. इंदीरा पारधी पिढी, पारा या इंदीरा पारधी पिढी येथे 8 लि. गावठी दारु (किं.अं. 610/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

सिताबाई भागवत शिंदे, रा. रामकुंड, ता. भुम या राहत्या घरी 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,700/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

मैनाबाई आबा पवार, रा. तांदुळवाडी, ता. वाशी या राहत्या घरा समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 850/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.आशाबाई शहाजी शिंदे व युनूसबाई शामराव गाडे, दोघी रा. पिंपळगांव (लिं), ता. वाशी या आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत 22 लि. गावठी दारु (किं.अं. 1,720/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. येरमाळा: हिराबाई कोंडीबा काळे, रा. बरमाचीवाडी, ता. कळंब या आपल्या राहत्या घरा जवळ गावठी दारु निर्मीतीचा 100 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 5 लि. (एकुण किं.अं. 4,750/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या. लालीबाई भारत काळे, रा. येरमाळा, ता. कळंब या मौजे दुधाळवाडी शिवारात 5 लि. गावठी दारु (किं.अं. 350/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

रमजान चाँद शेख, रा. वडजी, ता. वाशी हा मौजे वडजी येथे 9 लि. गावठी दारु (किं.अं. 640/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. उमरगा: लक्ष्मण राम लिंबोळे, रा. तुरोरी, ता. उमरगा हा मौजे तुरोरी येथे 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,200/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. भुम: राणीबाई धनाजी काळे, रा. पारधीपिढी, भुम या भुम येथील पार्डी रोड लगत असलेल्या शाळे जवळ 70 लि. गावठी दारु (किं.अं. 4,540/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पुजा कल्याण काळे, रा. हांडोग्री, ता. भुम या आपल्या राहत्या पत्रा शेड समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 520/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

सुनिल अंकुश वंजारी, रा. ईडा, ता. भुम हा बानगंग साखर कारखान्या जवळ देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. तामलवाडी: श्रीमंत नारायण गायकवाड, रा. धोत्री, ता. तुळजापूर हे मौजे धोत्री शिवारात 15 लि. गावठी दारु (किं.अं. 750/-रु.) बाळगले असतांना आढळले.

शिवशंकर हनुमंत गाटे व सचिन आबासाहेब बोधले, दोघे रा. दहीवडी, ता. तुळजापूर हे दोघे मौजे दहीवडी शिवारातील ‘जगदंबा पानटपरी’ समोर देशी दारुच्या 61 बाटल्या (किं.अं. 6,100/-रु.) बाळगले असतांना आढळले.


पो.ठा. मुरुम: लक्ष्मण मनोहर शेंडगे, रा. मुरुम हा मौजे मुरुम शिवारात 5 लि. गावठी दारु (किं.अं. 280/-रु.) बाळगला असतांना आढळला.

दिनकर शंकर कांबळे, रा. सुपतगाव, ता. उमरगा हा मौजे दाळींब शिवारातील महालक्ष्मी ढाब्याचे पाठीमागे देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 572/-रु.) बाळगला असतांना आढळला.

धनाजी लक्ष्मण सुरवसे, रा. तुगाव, ता. उमरगा हा मौजे तुगाव येथे 5 लि. गावठी दारु (किं.अं. 560/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. बेंबळी: रविकिरण महादेव इंगळे, रा. कनगरा, ता. उस्मानाबाद हा आपल्या राहत्या घरा समोर देशी दारुच्या 19 बाटल्या (किं.अं. 1,870/-रु.) बाळगला असतांना आढळला.

प्रभु गणपती राठोड, रा. पाडोळी (आ.), ता. उस्मानाबाद हा आपल्या राहत्या घरा समोर 20 लि. गावठी दारु (किं.अं. 810/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. कळंब: चंद्रभागा बब्रुवान पवार, रा. वाकडी पारधी पिढी, ता. कळंब या आपल्या राहत्या शेड समोर गावठी दारु निर्मीतीचा 50 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 2,000/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

गजराबाई उत्तम काळे, रा. कोठावळवाडी, ता. कळंब या राहत्या शेड समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

लोचनाबाई उमराव पवार, रा. डिकसळ, ता. कळंब या आपल्या राहत्या घरा समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

शालन बापू काळे, रा. बाजार मैदान, कळंब या राहत्या घरा लगत शेडमध्ये देशी दारुच्या 23 बाटल्या (किं.अं. 1,196/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.


पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): मिटु कार्तिक शिंदे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद हा येडशी येथील ठाकर वस्ती येथे गावठी दारु निर्मीतीचा 160 लि. द्रवपदार्थ (किं.अं. 13,800/-रु.) बाळगला असतांना आढळला.

सिध्देश्वर यादव खुणे, रा. येडशी हा मौजे येडशी येथील पानटपरी मध्ये देशी दारुच्या 18 बाटल्या (किं.अं. 468/-रु.) बाळगला असतांना आढळला.

भारत रामा पवार, रा. शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद हा शिंदेवाडी शाळे समोरील रस्त्यावर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 930/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. आंबी: भुजंग महिपती गायकवाड, रा. जेजला, ता. भुम हा मौजे जेजला येथील समाज मंदीर जवळ देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 1,200/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. आनंदनगर: अनिता नरेश काळे, रा. सांजा रोड, उस्मानाबाद या आपल्या राहत्या घरा समोर 19 लि. गावठी दारु (किं.अं. 810/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

उज्वला झुंबर काळे, रा. उस्मानाबाद या शिंगोली रोडवरील पाणी पुरवठा टाकी समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 420/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

शाकबाई नवनाथ पवार, रा. उस्मानाबाद या सेवालाल कॉलनी येथे 15 लि. गावठी दारु (किं.अं. 610/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. तुळजापूर: हनमंत बलभिम झाडे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे काक्रंबा येथील आपल्या राजमाता किराणा दुकानात देशी- विदेशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 1,700/-रु.) बाळगले असतांना आढळले.

नेताजी लक्ष्मण माने, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर हा तुळजापूर न्यायालया समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 5741 ने विदेशी दारुच्या 25 बाटल्या (किं.अं. 6,000/-रु.) वाहतुक करत असतांना आढळला.

पो.ठा. नळदुर्ग: सतिश मुरलीधर कनकधर, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग हा राहत्या घराच्या मागे 5 लि. गावठी दारु (किं.अं. 260/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. शिराढोण: रामराव हरिभाऊ पवार, रा. घारगांव तांडा, ता. कळंब हा राहत्या घरा जवळील पत्रा शेडमध्ये गावठी दारु निर्मीतीचा 300 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 10 लि. (एकुण किं.अं. 12,400/-रु.) बाळगला असतांना आढळला.

अंकुश भिमराव राठोड, रा. घारगांव तांडा, ता. कळंब हा राहत्या पत्रा शेडमध्ये गावठी दारु निर्मीतीचा 320 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 10 लि. (एकुण किं.अं. 13,720/-रु.) बाळगला असतांना तर त्याच परिसरात विनोद बालु पवार हा गावठी दारु निर्मीतीचा 400 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 10 लि. (एकुण किं.अं. 16,400/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. परंडा: सलिममीया अरब, रा. समता नगर, परंडा हा राहत्या घरा समोर देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. लोहारा: पंडीत रामसिंग राठोड, रा. होळी तांडा, ता. लोहारा हा राहत्या घरा समोर 18 लि. गावठी दारु (किं.अं. 1,440/-रु.) बाळगला असतांना आढळला.

2 comments

Unknown said...

Aaju buarpur thikani gavathi banavatat himmat aahe ka chapa takanyach

Unknown said...

Mee thikan sangu shakato
Yat police pan inval aahe