Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 18 छापेउस्मानाबाद  -  पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशाने अवैध मद्य विरोधात विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आज दि. दि. 06.08.2020 रोजी खालील प्रमाणे कारवाया करण्यात आल्या. छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा 1,020 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 122 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 175 बाटल्या, विदेशी दारुच्या 25 बाटल्या असा एकुण 68,516 ₹ ची अवैध दारु जप्त करण्यात आली. यावरुन संबंधीत पोलीस ठाण्यात म.दा.का. अंतर्गत 18 गुन्हे दाखल करण्यात आले असुन अवैध मद्य विरोधात कारवाया चालू आहेत.


पो.ठा. वाशी: काकुबाई बन्शी शिंदे, रा. इंदीरा पारधी पिढी, पारा या दि. 06.08.2020 रोजी इंदीरा पारधी पिढी येथे 8 लि. गावठी दारु (किं.अं. 610/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

सिताबाई भागवत शिंदे, रा. रामकुंड, ता. भुम या दि. 06.08.2020 रोजी राहत्या घरी 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,700/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

मैनाबाई आबा पवार, रा. तांदुळवाडी, ता. वाशी या दि. 06.08.2020 रोजी राहत्या घरा समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 850/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

आशाबाई शहाजी शिंदे व युनूसबाई शामराव गाडे, दोघी रा. पिंपळगांव (लिं), ता. वाशी या दि. 06.08.2020 रोजी आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत 22 लि. गावठी दारु (किं.अं. 1,720/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.पो.ठा. नळदुर्ग: सतिश मुरलीधर कनकधर, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग हा दि. 06.08.2020 रोजी राहत्या घराच्या मागे 5 लि. गावठी दारु (किं.अं. 260/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. तुळजापूर: नेताजी लक्ष्मण माने, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर हा दि. 06.08.2020 रोजी तुळजापूर न्यायालया समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 5741 ने विदेशी दारुच्या 25 बाटल्या (किं.अं. 6,000/-रु.) वाहतुक करत असतांना आढळला.

पो.ठा. आनंदनगर: उज्वला झुंबर काळे, रा. उस्मानाबाद या दि. 06.08.2020 रोजी शिंगोली रोडवरील पाणी पुरवठा टाकी समोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 420/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

शाकबाई नवनाथ पवार, रा. उस्मानाबाद या दि. 06.08.2020 रोजी सेवालाल कॉलनी येथे 15 लि. गावठी दारु (किं.अं. 610/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. तामलवाडी: शिवशंकर हनुमंत गाटे व सचिन आबासाहेब बोधले, दोघे रा. दहीवडी, ता. तुळजापूर हे दोघे दि 06.08.2020 रोजी मौजे दहीवडी शिवारातील ‘जगदंबा पानटपरी’ समोर देशी दारुच्या 61 बाटल्या (किं.अं. 6,100/-रु.) बाळगले असतांना आढळले.

पो.ठा. शिराढोण: रामराव हरिभाऊ पवार, रा. घारगांव तांडा, ता. कळंब हा दि. 06.08.2020 रोजी राहत्या घरा जवळील पत्रा शेडमध्ये गावठी दारु निर्मीतीचा 300 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 10 लि. (एकुण किं.अं. 12,400/-रु.) बाळगला असतांना आढळला. पथकाने तो द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला.अंकुश भिमराव राठोड, रा. घारगांव तांडा, ता. कळंब हा राहत्या पत्रा शेडमध्ये गावठी दारु निर्मीतीचा 320 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 10 लि. (एकुण किं.अं. 13,720/-रु.) बाळगला असतांना तर त्याच परिसरात विनोद बालु पवार हा गावठी दारु निर्मीतीचा 400 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 10 लि. (एकुण किं.अं. 16,400/-रु.) बाळगला असतांना आढळला. पथकाने तो द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला.

पो.ठा. कळंब: शालन बापू काळे, रा. बाजार मैदान, कळंब या दि. 06.08.2020 रोजी राहत्या घरा लगत शेडमध्ये देशी दारुच्या 23 बाटल्या (किं.अं. 1,196/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. परंडा: सलिममीया अरब, रा. समता नगर, परंडा हा दि. 06.08.2020 रोजी राहत्या घरा समोर देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): भारत रामा पवार, रा. शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद हा दि. 06.08.2020 रोजी शिंदेवाडी शाळे समोरील रस्त्यावर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 930/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. लोहारा: पंडीत रामसिंग राठोड, रा. होळी तांडा, ता. लोहारा हा दि. 06.08.2020 रोजी राहत्या घरा समोर 18 लि. गावठी दारु (किं.अं. 1,440/-रु.) बाळगला असतांना आढळला.

पो.ठा. येरमाळा: दत्तात्रय केरबा घोळवे, रा. सोनारवाडी, ता. वाशी हा काल दि. 05.08.2020 रोजी मौजे सोनारवाडी रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 032 वरुन दारुचा विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 180 मि.ली. देशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 3,840/-रु.)विनापरवाना वाहतुक करत असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला.


No comments