Header Ads

उस्मानाबाद : तलवार मिरवून दहशत पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखलउस्मानाबाद - उस्मानाबाद शहरात मोटारसायकलच्या हॅन्डलला  तलवार लटकवून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीवर आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सैफुद्दीन गुलाम सय्यद, वय 38 वर्षे, रा. साळुंके नगर, उस्मानाबाद हा आज दि. 05.08.2020 रोजी 10.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील पवनराजे निंबाळकर कॉम्प्लेक्स समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 3551 च्या हॅन्डलला तलवार लटकवून दहशत निर्माण करुन फिरत होता. यावरुन पो.ठा. आनंदनगर च्या पोकॉ- राजकुमार वाघमारे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन सैफुद्दीन याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम- 4, 25 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments