Header Ads

उस्मानाबाद जिल्हा : घात, अपघात, चोरी आदी गुन्हे दाखल 
चोरी.

पोलीस ठाणे, उमरगा: सलीम बाशसाब सरनोबत, रा. कसगी, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो पॅशन प्रो मो.सा. क्र. एम.एच. 24 एएल 8943 ही दि. 19.06.2020 रोजी मध्यरात्री आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. दुसऱ्या दिवशी ती लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सलीम सरनोबत यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे.


अल्पवयीन मुलीचे अपहरण.

पोलीस ठाणे, तुळजापूर: एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 03.08.2020 रोजी 12.30 वा. सु. तीच्या राहत्या कॉलनीतुन एका अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लाउन अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 

सुनेचा छळ, गुन्हा दाखल.

पोलीस ठाणे, नळदुर्ग: आशा रवी राठोड, रा. आलीबाद (तांडा), नळदुर्ग, ता. तुळजापूर या माहेरहुन पैसे आनत नसल्याने व मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुन 1)रवी बाबु राठोड (पती) 2) विमल राठोड (सासु) 3)बाबु राठोड (सासरा) 4)सुरेश राडोड (दीर) 5)सुदेश राठोड (दीर) 6)सुभाष राठोड (दीर) 7)ललीता व संगीता (दोघी जावा) सर्व रा. सरदारनगर तांडा, कदेर, ता. उमरगा या सर्वांनी आशा यांचा सन- 2017 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला.. अशा मजकुराच्या आशा राठोड यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 323, 504, 34 अन्वये गुन्हा दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 

अपघात.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): मेर विक्रम वीरजीभाई, रा. विरपुर, ता. जेठपुर, जि. राकोट, राज्य- गुजरात याने दि. 01.08.2020 रोजी 12.30 वा. सु. उस्मानाबाद येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर ट्रक क्र. जी.जे. 16 ऐयु 7700 हा निष्काळजीपणे, हयगईने ओव्हरटेक करतांना टँकर क्र. एम.एच. 04 डीएस 0708 ला पाठीमागून धडक दिल्याने टँकर पलटला. तसेच पुढे जाउन जगदंबा हॉटेल समोरील कार, स्कुटर, आयशर वाहनांस धडक दिली. यात संबंधीत वाहनांचे 10,75,000/-रु. चे आर्थिक नुकसान झाले. या अपघातात चालक- मेर वीरजीभाई स्वत: जखमी होउन त्याचा सहायक- भावेश भाई त्रिवेदी हा गंभीर जखमी झाला आहे.            अशा मजकुराच्या गजेंद्र जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मेर वीरजीभाई याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे

 

No comments