Header Ads

उमरगा : चोरीस गेलेले विदेशी मद्य जप्त, 2 आरोपी ताब्यात


 

उमरगा: रोहित राजेंद्र पतंगे, रा. बालाजी नगर, उमरगा यांच्या उमरगा शहरातील मनिषा बारच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 02.08.2020 ते 04.08.2020 कालावधीत तोडून आतील 52 खोकी विदेशी मद्य एकुण 3,79,680/-रु. किंमतीचा माल चोरुन नेला होता. यावरुन उमरगा पो.ठा. येथे गु.र.क्र. 268/2020 भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 नुसार दाखल आहे.

गुन्हा तपासात खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे उमरगा पो.ठा. चे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. अमोल मालुसरे, पोकॉ- कांबळे, दिवे, अनिल भोसले यांच्या पथकाने आरोपी- 1) श्रीनिवास जनार्दन माने- पाटील 2) गणेश गोपाळ मडोळे, दोघे रा. उमरगा यांना दि. 20.08.2020 रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मद्यापैकी 88,320/-रु. किंमतीचे 12 खोकी विदेशी मद्य जप्त केले असुन पुढील तपास पोउपनि- श्री अमोल मालुसरे हे करत आहेत.

   

अवैध मद्य विरोधी कारवाया


उस्मानाबाद जिल्हा: अवैध मद्य विरोधी कारवाईत दि. 19 व 20.08.2020 रोजी 7 छापे टाकुन 40 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 122 बाटल्या, विदेशी दारुच्या 31 बाटल्या (एकत्रीत किंमत 14,124 ₹) जप्त करण्यात आल्या. यावरुन 7 व्यक्तींविरुध्द पोलीसांनी संबंधीत पोलीस ठाण्यांत म.दा.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.


पो.ठा. वाशी: दशरथ पंढरीनाथ बुरुंगे, रा. घाटनांदुर, ता. भुम हा दि. 19.08.2020 रोजी गावातील पवार वस्ती येथे असलेल्या ‘हॉटेल आरती ढाबा’ मध्ये 180 मि.ली. विदेशी दारुच्या 7 बाटल्या (किं.अं. 980/-रु.) अवैधपणे बाळगाला असतांना आढळला.जनाबाई मोहन सुरवसे, रा. डोकेवाडी या दि. 19.08.2020 रोजी दोन वेळेस आपल्या राहत्या घरासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 78 बाटल्या (किं.अं. 4,056/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.

पो.ठा. लोहारा: अमोल श्रीकांत बिराजदार, रा. जेवळी (उ.), ता. लोहारा हा दि. 20.08.2020 रोजी गावातीलच ‘नविन ढाबा’ समोर 180 मि.ली. देशी दारुच्या 35 बाटल्या (किं.अं. 1,750/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.


पो.ठा. आनंदनगर: बाळासाहेब वसंत शिंदे, रा. उपळा, ता. उस्मानाबाद हा दि. 20.08.2020 रोजी मौजे उपळा येथील आपल्या शेतात 25 लि. गावठी दारु व 180 मि.ली. देशी दारुच्या 9 बाटल्या (एकुण किं.अं. 2,218/-रु.) अवैधपणे बाळगाला असतांना आढळला.


पो.ठा. तुळजापूर: शोभा हिरामन भोसले, रा. डिकमळ पिढी, ता. तुळजापूर या दि. 20.08.2020 रोजी मौजे मोर्डा शिवारातील वैष्णवी फुड इन्डस्ट्रीज समोरील रस्त्यावर 15 लि. गावठी दारु (किं.अं. 800/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.


एक अल्पवयीन बालक (विधीसंघर्षग्रस्त बालक) हा दि. 20.08.2020 रोजी तुळजापूर शहरातील उस्मानाबाद- तुळजापूर रस्त्यावर हंक मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 8100 वरुन 650 मि.ली. विदेशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 4,320/-रु.) अवैधपणे वाहुन नेत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळला.

No comments