Header Ads

उमरगा : घरफोडीतील मालासह आरोपी 24 तासात पोलीसांच्या ताब्यात


 उमरगा: लखन किरण चव्हाण, रा. महादेव गल्ली, उमरगा यांची शेजारी राहणारी मावशी ही दि. 15.08.2020 रोजी 10.00 वा. गावी गेली होती. ही संधी साधुन अज्ञात चोरट्याने त्यांच्या दाराचे कुलूप तोडून घरातील एलईडी टीव्ही, टेबल फॅन, गॅस सिलींडर असा एकुण 35,000/-रु. चा माल चोरुन नेला होता.


 हा प्रकार काल दि. 19.08.2020 रोजी सकाळी 11.00 वा. लखन चव्हाण यांच्या लक्षात आला. यावर त्यांनी उमरगा पोलीसांकडे धाव घेउन गु.र.क्र. 290/2020 भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 नुसार नोंदवला आहे. गुन्हा तपासात उमरगा पोलीसांनी वेगाने चक्रे फिरवून गोपनीय खबरेवरुन दि. 20.08.2020 रोजी संशयीतास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मुद्देमाल जप्त केला आहे. 


वीज रोहीत्राच्या साहित्य चोरीतील तेल जप्त, आरोपी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखा: मौजे दाभा येथील धनेगाव बंधाऱ्याच्या दक्षीण बाजूस असलेल्या वीज रोहित्रामधील तांबे धातूच्या 400 कि.ग्रॅ. तारा व 700 लि. तेल असा माल अज्ञात चोरट्याने दि. 08.08.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेला होता. यावरुन शिराढोण पो.ठा. येथे गु.र.क्र. 135/2020 भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

गुन्हा तपासात खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- किसन जगताप, थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, सर्जे यांच्या पथकाने दि. 20.08.2020 रोजी आरोपी- पिंटु माणिक काळे, वय 35 वर्षे, रा. शिराढोण यास ताब्यात घेउन नमूद मुद्देमालापैकी 400 लि. तेल व चोरी करण्यास वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. उर्वरीत तपासकामी त्यास पो.ठा. शिराढोणच्या ताब्यात देण्यात आले आहे.


No comments