Header Ads

उस्मानाबाद : चोरीस गेलेली डंपरची 4 चाके जप्त, अल्पवयीन आरोपी ताब्यातउस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील एका डंपरची चार चाके चोरणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी  ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.


मौजे येडशी, ता. उस्मानाबाद येथे असलेल्या खडी क्रशर केंद्रावर उभे असलेल्या डंपर क्र. एम.एच. 04 बीजी 6869 ची चार चाके व एक्सकॅव्हेटर यंत्र क्र. एम.एच. 16 एफ 6345 च्या इंधन टाकीतील 115 ‍लि. डिझेल दि. 13.08.2020 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरले होते. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 175/2020 भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल आहे.

गुन्हा तपासात खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने दि. 18.08.2020 रोजी एका अल्पवयीन आरोपीस (विधिसंधर्ष ग्रस्त बालक) ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मुद्देमालापैकी डंपरची 4 चाके जप्त केली असुन उर्वरीत कार्यवाहीस्तव त्यास पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) च्या ताब्यात दिले आहे.   

No comments