Header Ads

नाकाबंदी दरम्यान 158 कारवाया- 32,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 16.08.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 158 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 32,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

मनाई आदेशांचे उल्लंघन 8 पोलीस कारवायांत 1,900/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 14 व  15.08.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 3 कारवायांत- 600/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक स्थळी मास्क न लावणे: 1 कारवाईत- 500/- रु. दंड प्राप्त.
3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 4 कारवायांत 800/-रु. दंड प्राप्त.

मनाई आदेश झुगारुन किराणा दुकान चालू ठेवले, गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, वाशी: लहु जालिंदर अनभुले, रा. निपाणी, ता. भुम यांनी कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन दि. 16.08.2020 रोजी 19.00 वा. गावातील आपले किराण दुकान व्यवसायास चालू ठेवले. यावरुन पोहेकॉ- गोरख टकले यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अन्वये गुन्हा दि. 17.08.2020 रोजी नोंदवला आहे.


अवैध मद्यविरोधी कारवाई
पोलीस ठाणे, वाशी: बाबासाहेब मधुकर गीते, रा. आंद्रुड, ता. भुम हे दि. 16.08.2020 रोजी मौजे लांजेश्वर शिवारातील हॉटेल आशिर्वाद समोर देशी दारुच्या 180 मि.ली. च्या 6 बाटल्या (किं.अं. 312/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा दि. 17.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments