Header Ads

ढोकी: 32.38 कि.ग्रॅ. अवैध गांजा जप्त, दोघे अटकेत
पोलीस ठाणे, ढोकी: अवैध गांजा वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर मिळाल्यावरुन पो.ठा. ढोकीच्या पथकाने दि. 13.08.2020 रोजी मौजे तुगाव- तेर रस्त्यावरील अनिल पाटील यांच्या पत्रा शेडजवळ सापळा लावला. दरम्यान रविंद्र बब्रुवान वाघमोडे हा 17.00 वा. सु. बजाज प्लॅटीना मो.सा. क्र. एम.एच. 25 ए 5201 ही चालवत तेथे आला. त्याच्या पाठीमागे गावातीलच- अच्युत पवार हा एक पोते घेउन बसला होता. पथकाने त्यांची झडती घेतली असता त्या पोत्यात 15 पुडक्यांत एकुण 32.38 कि.ग्रॅ. गांजा वनस्पतीचा पाला- बी (किं.अं. 6,47,660 ₹) आढळले. पथकाने त्या दोघांना अटक करुन नमूद गांजा जप्त करुन एन.डी.पी.एस. कलम- 20 (ब), 29 अन्वये गुन्हा दि. 14.08.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाया

पोलीस ठाणे, भूम: 1) शाहरुख शेख, रा. गराडा गल्ली, भुम 2) सुग्रीव दिनकर वरळे, रा. उळुप, ता. भुम हे दोघे दि. 13.08.2020 रोजी गोलाई चौक, भुम येथील पानटपरीजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 620/-रु. बाळगले असतांना पो.ठा. भुम च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, तुळजापूर: 1) भारत राजपूत, रा. जवाहर चौक, तुळजापूर त्याच्या सोबत एक व्यक्ती असे दोघे दि. 13.08.2020 रोजी तुळलापूर येथील नवीन बसस्थानकाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 2,440/-रु. बाळगले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, आंबी: दिनकर उत्रेश्वर शिंदे, रा. आनाळा, ता. परंडा हा दि. 13.08.2020 रोजी गावातील कालीका देवी मंदीराजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 2,660/-रु. बाळगले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले.
       यावरुन वर नमूद 5 प्सक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाया

पोलीस ठाणे, लोहारा: धनराज शिवाजी रकाळे, रा. विलासपुर (पां.), ता. लोहारा हा दि. 13.08.2020 रोजी गावातील मयुरी हॉटेल समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 1,050/-रु.) बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, वाशी: ताराबाई शहाजी काळे, रा. पारधी पिढी, मौजे पार्डी, ता. वाशी या दि. 13.08.2020 रोजी आपल्या राहत्या घराजवळ गावठी दारु निर्मीतीचा 400 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 15 लि. (साहित्यासह एकुण किं.अं. 29,900/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. वाशी च्या पथकास आढळल्या.


       यावरुन वर नमूद 2 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


No comments