Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात आठ जुगार अड्ड्यावर छापेपरंडा: परंडा- कात्राबाद रस्त्यावरील बंद असलेल्या मुकबधीर शाळे जवळ जुगार अड्डा चालू असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन पो.ठा. परंडा च्या पथकाने दि. 11.08.2020 रोजी 18.00 वा. सु. छापा मारला. यावेळी त्या ठिकाणी 1) रमजान शेख 2) सिध्दार्थ चौतमहल 3) नवाज शेख 4) अक्षय कसबे, सर्व रा. परंडा असे चौघे तिरट जुगार खेळत असतांना आढळले. यावरुन पथकाने घटनास्थळावरील जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 1,110/-रु. जप्त केले.

 कळंब: साठे चौक, कळंब येथे एका पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालू असल्याबाब मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन पो.ठा. कळंब च्या पथकाने दि. 11.08.2020 रोजी 17.30 वा. सु. छापा मारला. यावेळी सदर ठिकाणी 1) सचिन बळीराम सरवदे, रा. कळंब 2) कृष्णा बाबुराव पायगीरे, रा. डिकसळ, ता. कळंब हे दोघे कल्याण मटका जगाराच्या साहित्यासह रोख 1,110/-रु. बाळगले असतांना आढळले.

 येरमाळा: येरमाळा बस स्थनका शेजारी जुगार चालू असल्याच्या खबरेवरुन पो.ठा. येरमाळा च्या पथकास दि. 11.08.2020 रोजी 18.45 वा. सु. छापा मारला. यावेळी नमूद ठिकाणी सुरेश बाळासाहेब पवार, रा. येरमाळा, ता. कळंब हा मिलन नाईट मटका जुगाराच्या साहित्यासह रोख 1,030/-रु. बाळगला असतांना आढळला.

 भूम: निलेश शेळके, गणेश मुसळे, दोघे रा. भुम हे दि. 12.08.2020 रोजी भुम बस स्थानका मागील ओट्यावर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,500/-रु. बाळगले असतांना पो.ठा. भुम च्या पथकास आढळले.

 शिराढोण: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण पोलीसांनी दि. 12.08.2020 रोजी दोन ठिकाणी छापे मारले. यात शिराढोण बस स्थानकाजवळील चहा हॉटेल मध्ये विनायक चंदन हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख 540/-रु. च्या मालासह तर दुसऱ्या घटनेत शासकीय आरोग्य केंद्रा बाहेरील चहा हॉटेल मध्ये पाशा गुलाम बेग हा कल्याण मटका जुगार साहित्य व रोख 510/-रु. च्या मालासह पो.ठा. शिराढोण च्या पथकास आढळला.

 ढोकी: मजीद रशीद शेख, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हा दि. 12.08.2020 रोजी ढोकी बस स्थानक परिसरातील पेट्रोलीयम विक्री केंद्राजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 500/-रु. बाळगले असतांना पो.ठा. ढोकी च्या पथकास आढळला.

 तुळजापूर: धर्मा राम जाधव रा. वेताळ गल्ली, तुळजापूर हा दि. 12.08.2020 रोजी औदुंबर भक्त निवास समोरील पानटपरी जवळ कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,710/-रु. बाळगले असतांना पो.ठा. तुळजापूर च्या पथकास आढळला.

उमरगा: राम माधव हराळे, रा. जकेकुर, ता. उमरगा हा दि. 12.08.2020 रोजी मौजे जकेकुर चौरस्ता येथील आपल्या पानटपरीवर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 1,230/-रु. बाळगले असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.

       यावरुन वर नमूद 14 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No comments