Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल  शिराढोण - रस्ता मालकी- रहदारीच्या कारणावरुन माउली पांडुरंग समुद्रे, रा. बोरगाव (खु.), ता. कळंब यांना दि. 03.08.2020 रोजी 15.30 वा. सु. मौजे जुने बोरगाव (खु.) येथे गावातील भाऊबंद- अजय शहुराज समुद्रे व अनिल साळुंके, रा. घारगाव यांनी शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात माउली समुद्रे यांचे दोन दात पडून ते जखमी झाले आहेत. अशा मजकुराच्या माउली समुद्रे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा दि. 03.08.2020 रोजी नोंदवला आहे.

 

 उमरगा: घरा समोरील नळास विद्युतपंप लावून पाणी भरण्याच्या कारणावरुन कारणावरुन मौजे आष्टा (ज.), ता. उमरगा येथील जाधव कुटूंबीयांतील अंबादास रामा जाधव, राजेंद्र, किशोर, नागोराव जाधव यांच्या गटाचा गल्लीतील गायकवाड कुटूंबीयांतील- उध्दव गायकवाड, प्रदिप, संदीप, ओम, संभाजी, शिवाजी गायकवाड यांच्या गटाशी दि. 02.08.2020 रोजी 19.00 वा. सु. वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परांस शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.


अशा मजकुराच्या दोन्ही गटातील सदस्यांनी परस्पर विरोधी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दोन्ही गटातील सदस्यांवर पो.ठा. उमरगा येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 03.08.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

No comments