नियमबाह्य आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल




उमरगा:  दूध दरवाढ मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवारी उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. उमरग्यात नियमबाह्य आंदोलन केले म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल  केला आहे. 

 कोविड- 19 संसर्गाच्या अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी विविध मनाई ओदश जारी केले आहेत. असे असतांनाही ते मनाई आदेश झुगारुन 1)कैलास शिंदे, रा. उमरगा 2) दयानंद पवार 3)प्रदिप सांगवे 4)दिलीप मुंगळे, तीघे रा. नारंगवाडी, ता. उमरगा 5)माधव पवार, रा. कोराळ, ता. उमरगा 6)सिध्देश्वर माने, ना. नाईचाकुर, ता. उमरगा 7)राम लवटे, रा. बोरी 8)भागवत पाटील, रा. कवठा, ता. उमरगा अशा आठ जणांनी दुध भाव वाढीसाठी दि. 01.08.2020 रोजी 10.030 वा. सु. मौजे नारंगवाडी येथे रास्तारोको आंदोलन केले. यावरुन पोलीसंनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 8 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments