Header Ads

मुरूम : मारहाणीत एकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखलमुरुम: पाशा रसुल पटेल, वय 50 वर्षे, रा. दाळींब, ता. उमरगा हे दि. 08.08.2020 रोजी सायंकाळी 18.00 वा. सु. गावातील- अबु तालीब यांच्या घराजवळ होते. यावेळी गावकरी- अबुतालीब फकीर व त्यांची मुले- रियाज, फैयाज यांसह जाकीर शेख, मुजम्मील मुगळे, तौफिक मुल्ला अशा सहा जणांनी दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन पाशा पटेल यांना लाथा-बुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. या मारहाणीत रियाज फकीर याने लाकडी दांड्याचा फटका पाशा पटेल यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यु झाला. अशा मजकुराच्या हक्कानी पटेल (मयताचा भाऊ) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद सहा व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 302 अन्वये गुन्हा दि. 09.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments