शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला करणारा आरोपी जेलमधून पळाला

 
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला करणारा आरोपी जेलमधून पळाला


उस्मानाबाद - उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनी हल्ला करणारा आरोपी अजिंक्य टेकाळे हा आज ( सोमवार ) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून केल्याने जिल्ह्यात  खळबळ उडाली आहे.



विधानसभा निवडणुकीच्या वेळी  शिवसेना उमेदवार कैलास  पाटील यांच्या प्रचारार्थ  जाहीर सभेसाठी खासदार ओमराजे निंबाळकर  पाडोळी ( नायगाव ) येथे गेले असता, दि. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी याच गावातील  अजिंक्य टेकाळे  याने चाकूने खुनी हल्ला केला होता, पण ओमराजे बालंबाल बचावले होते.

त्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे यास पोलिसांनी अटक करून जेल मध्ये रवानगी केली होती, गेल्या दहा महिन्यापासून तो जेलची तो हवा खात आहे.



कोरोना संसर्गमुळे तांबरी विभागात तात्पुरते कारगृह  करण्यात आले आहे. त्यात आरोपी टेकाळे  यास ठेवण्यात आले आहे. त्यास आज वैद्यकीय  तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयातून तात्पुरत्या जेल मध्ये आल्यानंतर जेल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला आहे.

 ही  माहिती मिळताच, पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.पोलिसांना हिसका देऊन आरोपी पळाल्याचे  त्यांचे  म्हणणे आहे.

नेमके काय घडले ? 

शिराढोण पो.ठा. गु.र.क्र. 146 / 2019 भा.दं.सं. कलम-307 या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी- अजिंक्य मधुकर टेकाळे, रा. पाडोळी, ता. कळंब हा उस्मानाबाद कारागृहात होता. त्यास वैद्यकीय उपचार- परिक्षणकामी दि. 14.08.2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे दाखल केले होते. उपचारानंतर आज दि. 17.08.2020 रोजी त्याची मुक्तता झाल्याने पोलीस मुख्यालयातील पोना- लक्ष्मण धोत्रीकर त्यास कोविड- 19 संबंधी उभारलेल्या जिजामाता मुलींचे वसतीगृह, उस्मानाबाद या तात्पुरत्या कारागृहात दाखल करत होते. दरम्यान ही दाखल प्रक्रीया सुरु असतांना अजिंक्य टेकाळे हा पोना- लक्ष्मण धोत्रीकर यांच्या हातास झटका देउन पळून गेला. यावरुन पो.ठा. आनंदनगर येथे गु.र.क्र. 223/2020 भा.दं.सं. कलम- 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


From around the web