Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल उमरगा: मधुकर बिराजदार, रा. बेटजवळगा, ता. उमरगा हे दि. 06.08.2020 रोजी 19.30 वा. सु. आपल्या घरा समोर उभे होते. यावेळी गावातीलच- राजु बिराजदार, सुरेश बिराजदार, दशरथ बिराजदार या तीघा भावांनी व राजु बिराजदार यांचा मुलगा संदीपान अशा चौघांनी मधुकर यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन, काठी, विळ्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मधुकर बिराजदार यांच्या फिर्यादीवरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे.


भूम : सुरज साठे, रा. लक्ष्मीनगर, भुम हे दि. 05.08.2020 रोजी 19.00 वा. सु. बाजार समिती आवार, भुम येथे भाऊ- अनिल समवेत होते. यावेळी त्यांच्या गल्लीतीलच- स्वप्नील हावळे याने पुर्वीच्या भांडणावरुन सुरज साठे यांना व त्यांचा बचाव करणाऱ्या भाऊ- अनिल या दोघांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्या, काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या सुरज साठे यांच्या फिर्यादीवरुन स्वप्नील हावळे विरुध्द गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments