Header Ads

ढोकी : बुकनवाडी येथे तरुणाचा खून


ढोकी -  उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथील एका २० वर्षीय तरुणाचा गावातील जुन्या संघर्षांवरून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

1) पांडुरंग छागन वाकुरे 2) बालाजी छगन वाकुरे 3) पोपट छगन वाकुरे 4) योगेश अरुण वाकुरे 5) समाधान हरिभाउ वाकुरे 6) अंकुश इंद्रजित बुकन, सर्व रा. बुकनवाडी, ता. उस्मानाबाद या सहा जणांचा गावकरी- सुरेश अरुण काळे, वय 20 वर्षे यावर गावातील एका संघर्षाने राग होता. त्याचा बदला घेण्याकरीता नमुद सर्वांनी दि. 19.08.2020 रोजी 13.00 वा. सु. सुरेश काळे यास गावातील लोहमार्गा जवळील गायराण शेतात नेउन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दोरीने गळा आवळुन त्याचा खुन केला. तसेच त्याच्या आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी त्याच्या प्रेतास गळफास लावून लिंबाच्या झाडास लटकवले.

अशा मजकुराच्या रुक्मीण अरुण काळे (मयताची आई) यांनी दि. 20.08.2020 रोजी दिलेल्या प्रथम बखरेवरुन नमूद सहा व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 201, 143, 147, 149, 323 सह म.पो.का. कलम- 135 सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण


 येरमाळा: ट्रक उभा करण्याच्या वादावरुन मौजे सोनारवाडी, ता. वाशी येथील धनंजय घोळवे यांच्या गटाचा उत्तरेश्वर घोळवे यांच्या गटाशी दि. 21.08.2020 रोजी 12.00 वा. सु. संघर्ष झाला. यात दोन्ही गटांनी परस्परांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या परस्परविरोधी गटांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


उस्मानाबाद जिल्हा: गुरांनी पिकाची नासधुस केल्याचा जाब एका महिलेने (नाव- गाव गोपनीय) दि. 20.08.2020 रोजी गुरांच्या मालक कुटूंबीयांस विचारला यावर गुरे मालक कुटूंबीयांनी चिडून जाउन बेकायदेशीर जमाव जमवून त्या महिलेसह तीच्या कुटूंबीयांस लाथाबुक्‍क्यांनी मारहाण करुन तसेच तीच्या अंगातील कपडे फाडून तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 354 (ब), 504 नुसार गुन्हा नोंदवला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

खुप अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे