Header Ads

उस्मानाबाद : नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी पदभार स्वीकारला

उस्मानाबाद - उस्मानाबादचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकरी दीपा मुधोळ- मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले. 


 उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून  पुण्याच्या भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे संचालक  कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती शासनाने केलेली आहे. त्यामुळे नवनियुक्त जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांकर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून आज दि.21 ऑगस्ट  रोजी पदभार स्वीकारला.


यावेळी  मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते,निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनुपम शेगुलवार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे,उपविभागीय अधिकारी कळंब अहिल्या गटाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख,उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत संजय तुबाकले,तहसिलदार गणेश माळी इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments