Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन जणांचा मृत्यूपरंडा: राजकुमार नवनाथ गुडे, वय 35 वर्षे हे संजय ज्ञानदेव गुडे, दोघे रा. आवारपिंपरी, ता. परंडा हे दोघे दि. 02.08.2020 रोजी 13.30 वा. सु. कुर्डवाडी- परंडा असा प्रवास मो.सा. क्र. एम.एच. 25 आर 7728 ने करत होते. दरम्यान परंडा येथे संजय गुडे यांनी मोटारसायकल निष्काळजीपणे, हयगईने चालवून खड्ड्यातून घातली. यात पाठीमागे बसलेले राजकुमार गुडे हे खाली पडून गंभीर जखमी झाल्याने बार्शी येथील ईस्पीतळात दि. 04.08.2020 रोजी उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर अजिनाथ घळके, रा. आवारपिंपरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संजय गुडे यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे. वाशी: चालक- मोहन नवनाथ काळे, रा. लिंबारुई, ता. बीड यांनी दि. 07.08.2020 रोजी 13.00 वा.सु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 ने जातांना आपल्या एम.एच. 23 यु 2737 या मिनी ट्रकची पाठीमागील झडप (फाळके) उघडी ठेवली होती. दरम्यान सरमकुंडी फाटा येथील स्वरा हॉटेल समोर ट्रकच्या पाठीमागील हौदात झोपलेले चन्नु जैनोद्दीन शेख, वय 49 वर्षे, रा. कुंबेफळ, ता. केज हे मिनी ट्रक मधून पाठीमागे रोडवर पडून गंभीर जखमी होउन मयत झाले. त्यांच्या या मृत्युस चालक- मोहन काळे यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. अशा मजकुराच्या आमीन मेहबुब सय्यद, रा. खाजानगर, कासी वेस, बीड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 07.08.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments