गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन आपली माहिती दिली. शहा यांनी ट्वीट केले की, कोरोना संसर्गाची प्राथमिक चिन्हे दिसू लागताच माझी तपासणी झाली. माझा चाचणी अहवाल सकारात्मक आला. माझी प्रकृती ठीक आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल आहे. गेल्या काही दिवसात माझ्याशी संपर्क साधलेले तुम्ही सर्वांनी मला विनंती आहे की कृपया स्वतःला वेगळा करा आणि तुमची तपासणी  करा.


No comments