Header Ads

नळदुर्ग : ट्रकने धडक दिल्याने एक जखमीनळदुर्ग: संतोष श्रीपती कदम, वय 37 वर्षे, रा. भुड, ता. खानापुर, जि. सांगली हे दि. 02.08.2020 रोजी 17.00 वा. सु. मौजे जळकोट बस स्थानक समोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 10 बीएच 8987 चालवत जात होते. दरम्यान महेबुब कफुर मडडे, रा. मुरुम, ता. उमरगा याने ट्रक क्र. एन.एल. 01 एडी 0880 हा निष्काळजीपणे चालवून संतोष कदम यांच्या मो.सा. ला धडक दिली. या अपघातात संतोष कदम यांच्या उजवा पाय चिरडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या समाधान नंदकुमार जाधव, रा. तडवळे, ता. आटपाडी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद ट्रक चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 04.08.2020 रोजी नोंदवला आहे.

मारहाण

 बेंबळी: राधा रावसाहेब खराबे, रा. सांगवी, ता. उस्मानाबाद यांना दि. 18.07.2020 रोजी 19.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरा समोर भाऊबंद- माणिक सोनबा खराबे, शालु खराबे, धोंडराम खराबे, सुवर्णा खराबे अशा चौघांनी शेतबांधाच्या कारणाची कुरापत काढून राधा खराबे व त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन, काठी- दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राधा खराबे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद चौघांविरुध्द गुन्हा दि. 04.08.2020 रोजी नोंदवला आहे.

                                                                                    

No comments