पार्थ पवार यांची बाजू घेत, मल्हार पाटील म्हणाले...

 

पार्थ पवार यांची बाजू घेत, मल्हार पाटील म्हणाले...


उस्मानाबाद - शरद पवार यांनी, नातू पार्थ पवार यांच्याबद्दल टिप्पणी केल्यानंतर माजी मंत्री  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची बाजू घेत "तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिलं आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचं कसं हे आपल्याला माहित आहे."


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असून त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.

त्यावर माजी मंत्री  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील  यांनी  फेसबुकवर आपली प्रतिक्रिया लिहिली आहे. 

You are a born fighter and I’ve seen that since I was a child. I’m proud of you. We are from Osmanabad, we know how to fight.


पार्थ पवार आणि मल्हार पाटील यांचे नाते काय ? 

उस्मानाबादचे मल्हार पाटील हे माजी मंत्री  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू  आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार यांची आई सुनेत्रा  पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे जवळचे नाते संबंध तर आहेत पण दोघे चांगले मित्र आहेत.

You are a born fighter and I’ve seen that since I was a child. I’m proud of you. We are from Osmanabad, we know how to fight.
Posted by Malhar Patil on  Wednesday, August 12, 2020

From around the web