Header Ads

उस्मानाबाद जिल्हा: अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 36 छापे


  उस्मानाबाद  - काल बुधवार दि. 19.08.2020 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 36 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात 561 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 189 बाटल्या, शिंदी- 200 लि., विदेशी दारुच्या 17 बाटल्या व बिअरच्या 24 बाटल्या (एकत्रीत किंमत 57,916 ₹) जप्त करण्यात आल्या. यावरुन 38 व्यक्तींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यांत म.दा.का. अंतर्गत 36 गुन्हे पोलीसांनी नोंदवले आहेत.


पो.ठा. उस्मानाबाद (श.): 1)दिपक रघुनाथ पवार, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद 2)शिंगलाबाई राम पवार, रा. नवामोंढा, उस्मानाबाद 3)दशरथ छगन पवार, रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद 4)अमित सुरते 5)देवानंद झेंडे, दोघे रा. बौध्दनगर, उस्मानाबाद हे सर्व आपापल्या राहत्या घरा समोर एकत्रीत 280 लि. गावठी दारु (साहित्यांसह किं.अं. 15,450/-रु.) अवैधपणे बाळगले असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) च्या पथकास आढळले.


पो.ठा. आनंदनगर: 1)सुरेखा शिवाजी पवार, रा. पारधी पिढी, सांजा, ता. उस्मानाबाद 2)भागबाई गोविंद पवार, रा. शिवनेरीनगर, उस्मानाबाद 3)राजदीप विक्रम जालन, रा. काकडे प्लॉट, उस्मानाबाद हे तीघे उस्मानाबाद शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रीत 30 लि. गावठी दारु व विदेशी दारुच्या 17 बाटल्या (एकुण किं.अं. 5,480/-रु.) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.


पो.ठा. लोहारा: 1) योगेश सुरेश जाधव, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा 2) महादेव भानुदास पाटोळे, रा. पेठसांगवी 3) वेणु राजेश तुलाल, रा. तावशीगड, ता. लोहारा हे तीघे आपापल्या राहत्या घरासमोर दारुची विनापरवाना विक्री करत असतांना एकत्रीत देशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 2,802/-रु.) बाळगले असतांना आढळले.


पो.ठा. तुळजापूर: दिपक शिंदे, रा. वेताळनगर, तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा समोर एका बॅरेल मध्ये 200 लि. शिंदी व  कॅन मध्ये 35 लि. गावठी दारु (किं.अं. 10,000/-रु.) बाळगला असतांना आढळला.

आशिष बापु भडकवाड, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर हा गावात रायखेल रस्याचे बाजूस बिअरच्या 24 बाटल्या (किं.अं. 3,360/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना आढळला.


रामचंद्र महादेव कांबळे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घरा समोर कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500/-रु.) अवैधपणे बाळगाला असतांना आढळला.पो.ठा. वाशी: सारीका पांडुरंग काळे, रा. जवळगा, ता. वाशी या आपल्या राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 750/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.


बाबासाहेब सिताराम हारे, रा. पारगांव, ता. वाशी हे गावातील हॉटेल शिवबा च्या पाठीमागे अवैधपणे देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 416/-रु.) बाळगले असतांना आढळले.


ईश्वर यशवंत गायकवाड, रा. घाटपिंपरी, ता. वाशी हा आपल्या पत्रा शेडच्या बाजूस कॅनमध्ये 18 लि. गावठी दारु (किं.अं. 1,540/-रु.) अवैघपणे बाळगाला असतांना आढळला.


पो.ठा. कळंब: ताई अर्जुन काळे व अंजनाबाई गणपती काळे, दोघी रा. पारधी पिढी, अंदोरा, ता. कळंब या दोघी आपापल्या राहत्या घराच्या बाजूस एकत्रीत 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,030/-रु.) अवैधपणे बाळगल्या असतांना आढळल्या.


विष्णु चत्रभुज थोरात, रा. मस्सा (ख), ता. कळंब हे गावातील बसस्थानकाजवळ अवैधपणे देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520/-रु.) बाळगले असतांना आढळले.


लालाबाई बापु पवार, रा. एकतानगर, डिकसळ या राहत्या कॉलनीत एका कॅनमध्ये 20 लि. गावठी दारु (किं.अं. 1,000/-रु.) बाळगल्या असतांना आढळल्या.


पो.ठा. ढोकी: 1) बप्पा मोतीराम चव्हाण, रा. राजेशनगर पारधी पिढी, ढोकी 2) रुपाबाई बिसराम शिंदे, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हे दोघे आपापल्या गावात एकत्रीत 45 लि. गावठी दारु व देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 3,072/-रु.) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.


पो.ठा. बेंबळी: नंदकुमार प्रकाश पवार, रा. समुद्रवाणी तांडा, ता. उस्मानाबाद हा मौजे पाडोळी शिवारातील तुळजाभवानी ढाबा येथे देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.

नामदेव गोवर्धन आल्टे, रा. नितळी, ता. उस्मानाबाद हे मौजे नितळी- कौंड रस्त्यालगत अवैधपणे देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 600/-रु.) बाळगले असतांना आढळले.


पो.ठा. भुम: कृष्णाथ साहेबराव सोनवणे, रा. उमाचीवाडी, ता. भुम हा उमाचीवाडी फाटा येथे अवैधपणे देशी दारुच्या 17 बाटल्या (किं.अं. 884/-रु.) बाळगला असतांना आढळला.


नाना अधिकराव शेळवणे, रा. वाल्हा, ता. भुम हा गावातील आपल्या शिलाई दुकानासमोर अवैधपणे देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 990/-रु.) बाळगला असतांना आढळला.


पो.ठा. नळदुर्ग: गंगुबाई खुबा राठोड, रा. वसंतनगर, नळदुर्ग या गावातील आपल्या शेतात एका कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 510/-रु.) अवैधपणे बाळगलया असतांना आढळल्या.


उध्दव विश्वंभर साळुंके, रा. बोरगांव (तु.), ता. तुळजापूर हा आपल्या राहत्या घराच्या बाजूस 10 लि. गावठी दारु (किं.अं. 580/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.


पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): मेधराज विनायक रोटे, रा. वरुडा, ता. उस्मानाबाद हा आपल्या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु (किं.अं. 610/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.


सिध्देश्वर खुने, रा. जुने रेल्वे स्थानकजवळ, उस्मानाबाद हे जुने रेल्वे स्थानकजवळ अवैधपणे देशी दारुच्या 22 बाटल्या (किं.अं. 572/-रु.) बाळगले असतांना आढळले.


पो.ठा. येरमाळा: अनिल मोहन तौर व विलास माळी, दोघे रा. गौर, ता. कळंब हे दोघे गावातील खंडोबा मंदीराजवळ 5 लि. गावठी दारु (किं.अं. 550/-रु.) बाळगले असतांना आढळले.


प्रदीप मसु शिलवंत, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी हा आपल्या राहत्या कॉलनीत अवैधपणे देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 800/-रु.) बाळगला असतांना आढळला.


पो.ठा. उमरगा: करण शंकर राठोड, रा. बलसुर तांडा, ता. उमरगा हा आपल्या राहत्या घरासमोर 48 लि. गावठी दारु (किं.अं. 2,600/-रु.) अवैधपणे बाळगला आसतांना आढळला.


पो.ठा. परंडा: महादेव शंकर खरात, रा. कारंजा, ता. भुम हा गावातील सिना नदीच्या कडेला देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.


पो.ठा. आंबी: वासुदेव येडबा हजारे, रा. ताकमोडवाडी, ता. परंडा गावातील हॉटेल मल्हारच्या बाजुस देशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 960/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना आढळला.


पो.ठा. तामलवाडी: भिमा रामचंद्र सुरते, रा. सुरतगांव, ता. तुळजापूर हे आपल्या राहत्या घराच्या बाजूस 10 लि. गावठी दारु (किं.अं. 600/-रु.) बाळगले असतांना आढळले.


No comments