Header Ads

उस्मानाबाद : मनाई आदेश झुगारुन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री- 3 गुन्हे दाखलउस्मानाबाद -  कोविड- 19 संसर्गाच्या प्रतीबंध व्हावा यासाठी मा. जिल्हाधिकारी तथ अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. त्या आदेशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी खालील व्यक्तींविरुध्द पोलीसांनी गुन्हे नोंदवले आहेत.

1) गोपाळ राठोड, रा. कदेर, ता. उमरगा हे दि. 04.08.2020 रोजी 17.00 वा. सु. उमरगा येथील साईबाबा हॉस्पीटल समोरील हॉटेल मध्ये तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करत असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळले.

2) रामचंद्र दगडूलाल बांगड, रा. सावरकर चौक, उस्मानाबाद हे दि. 04.08.2020 रोजी 18.30 वा. सु. बस स्थानकामागील समर्थनगर परिसरात बांगड किराणा या दुकानात 43,354/-रु. किंमतीचा तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगला असतांना पो.ठा. आनंदनगरच्या पथकास आढळले.

3) कडकनाथवाडी, ता. वाशी येथील कोविड- 19 प्रतिबंधीत क्षेत्रातून दि. 04.08.2020 रोजी 18.30 वा. गावकरी- दादा अजिनाथ धावारे यांनी विनाकारण बाहेर जाउन तसेच नाका- तोंडास मास्क न लावता निष्काळजीपणाची कृत्य करुन मनाई आदेशाचे उल्लंघन केले.  

वरील प्रकरणांत पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

No comments