Header Ads

हाणामारीचे तीन गुन्हे दाखलपोलीस ठाणे, मुरुम: महादेव मारुती घांटे, रा. दाळींब, ता. उमरगा हे दि. 01.07.2020 रोजी मौजे दाळींब येथील आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- विठोबा सुरवसे व महेश विठोबा सुरवसे या दोघा पिता- पुत्रांनी शेतातील पिकातुन बैलगाडी नेण्याच्या कारणावरुन महादेव घांटे यांना शिवीगाळ करुन, चाबकाने, काठीने मारहाण केली. मारहाण सोडवण्यास आलेल्या महादेव यांच्या आई- सुबाबाई यांनाही नमूद पिता- पुत्रांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत महादेव यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या महादेव घांटे यांच्या फिर्यादीवरुन नमूद पिता- पुत्रांविरुध्द गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, वाशी: सुहास सर्जेराव मोटे, रा. अंजनसोंडा, ता. भुम यांनी मौजे अंजनसोंडा येथील आपल्या शेतातील शेडच्या विटा काढण्याचा जाब दि. 06.07.2020 रोजी 15.30 वा. सु. भाउ- गुणवंत मोटे व रेखा गुणवंत मोटे यांना विचारला. त्यावर चिडून जाउन गुणवंत मोटे व रेखा मोटे या दोघांनी सुहास मोटे यांच्या डोक्यात टिकाव मारुन त्यांना जखमी केले. सुहास यांची पत्नी मारहाण सोडवण्यास आली असता तीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुहास मोटे यांच्या फिर्यादीवरुन नमूद दोघा आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: अच्युत व्यंकट काकडे, रा. नितळी (कोंड), ता. उस्मानाबाद हे दि. 23.06.2020 रोजी 19.00 वा. सु. बस स्थानक, नितळी येथे थांबले होते. यावेळी भाऊबंद- महादेव काकडे, भागवत काकडे, बाळु काकडे, लक्ष्मी काकडे या चौघांनी सामाईक विहीरतील पाणी वाटपाच्या कारणावरुन अच्युत काकडे यांना लोखंडी गजाने, काठीने मारहाण केली. वडीलांस वाचवण्यास आलेल्या किरण यासही नमूद आरोपींनी दगड- काठीने मारहाण करुन जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत अच्युत यांच्या नाकाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या अच्युत काकडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि. 06.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments