Header Ads

विनापरवाना जिल्हा प्रवेश केलेल्या 2 व्यक्तींवर नगरपंचायती तर्फे गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, लोहारा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने विनापरवाना प्रवेशास जिल्ह्याच्या सर्व सिमा बंद आहेत. असे असतांनाही 1)सिकंदर मोहंमद पटेल, रा. हात्तुर, ता. सोलापूर (द.) 2)जयमराम सुर्यकांत पवार, रा. गुंजेगाव, ता. सोलापूर (द.) या दोघांनी दि. 05.07.2020 रोजी 10.00 वा.सु. पोलीस नाकाबंदीस टाळून छुप्या मार्गाने लोहारा शहरात प्रवेश केला. या कृतीमुळे कोविड- 19 चा संसर्ग होण्याची जाणीव असतानाही त्या दोघांनी असे निष्काळजीपणाचे कृत्य केले.
यावरुन नगरपंचायत कर्मचारी- कमलाकर मुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 34 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

मनाई आदेश झुगारुन दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर पोलीसांतर्फे 2 गुन्हे दाखल.
पोलीस ठाणे, उमरगा: कोविड- 19 रोगाच्या संक्रमनास आळा बसावा यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उमरगा नगरपालीका हद्दीत दि. 06.07.2020 ते 10.07.2020 या काळात मनाई आदेश अंमलात आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 06.07.2020 रोजी प्रविण भारत गायकवाड यांनी ‘प्रभात फोटो स्टुडीओ’ हा 11.16 वा. व्यवसायास चालू ठेवल्याचे तर गोपाळ मारुती मडोळे यांनी ‘लाँड्री दुकान’ 11.45 वा. व्यवसायास चालू ठेवल्याचे उमरगा पो.ठा. यांच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 2 गुन्हे दि. 06.07.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

जुगार प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., उस्मानाबाद (श.): 1) श्रीराम ओव्हाळ, रा. दारफळ, ता. उस्मानाबाद 2) रुपेश शेरखाने, रा. उस्मानाबाद हे दोघे दि. 06.07.2020 रोजी सांजा चौक, उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवित असतांना कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 630/-रु. सह पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., नळदुर्ग: महादेव सिध्दा मोरे, रा. गुजनुर, ता. तुळजापूर हा दि. 05.07.2020 रोजी आपल्या राहत्या घरा समोर दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने 12 ली. गावठी दारु (किं.अं. 600/-रु.) कब्जात बाळगला असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळला. यावरुन त्यांच्याविरुध्द पो.ठा. नळदुर्ग येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments