3 गुन्ह्यातील 3 पाहिजे आरोपी अटकेत
स्थानिक गुन्हे शाखा: पाहिजे –फरारी आरोपींच्या शोधार्थ उस्मानाबाद पोलीसांनी मोहीम उघडली आहे. त्या अंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री आण्णाराव खोडेवाड, सपोफौ- खोत, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, कुनाल दहिहंडे, पोकॉ- गणेश सर्जे यांच्या पथकाने खालील तीन आरोपींस वेगवेगळ्या ठिकाणांहुन दि. 29.07.2020 रोजी ताब्यात घेउन उर्वरीत कार्यवाहीस्तव संबंधीत पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

1) पो.ठा. परंडा गु.र.क्र. 25/2018 भा.दं.सं. कलम- 395 या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- लखन कांतीलाल पवार, वय 28 वर्षे, रा. सावदरवाडी, ता. परंडा.
2) पो.ठा. आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 154/2018 भा.दं.सं. कलम- 395 या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- अमोल बुशा शिंदे उर्फ लल्या, वय 24 वर्षे, रा. वैराग, ता. बार्शी.
3) उस्मानाबाद‍ (श.) पो.ठा. गु.र.क्र. 197/2018 भा.दं.सं. कलम- 457, 380 या घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी- अजय किरण भोसले, वय 20 वर्षे, रा. वैराग, ता. बार्शी.
           
नाकाबंदी दरम्यान 158 कारवाया- 33,600 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, गर्दी टाळावी या उद्देशाने जमावबंदी व विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 29.07.2020 रोजी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 158 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 33,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे. मनाई आदेशांचे उल्लंघन 45 पोलीस कारवायांत 12,300/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व इतर शाखां मार्फत दि.29.07.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया करण्यात आल्या.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 34 कारवायांत- 6,800/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 11 कारवायांत- 5,500/-रु. दंड प्राप्त.


No comments