Header Ads

क्वारंटाईन कक्ष सोडला, डॉक्टरसह दोघांवर गुन्हा दाखल


पोलीस ठाणे, परंडा: कोविड रुग्णाच्या संपर्कात आल्याने 1)डॉ. विशाल जगदेवराव सपकाळ 2)राजेश गायकवाड, दोघे रा. भुम यांना कोविड केअर सेंटर, आंबेडकर वस्तीगृह, गोलेगाव येथे क्वारंटाईन करण्यात येउन त्यांच्या घशातील लाळेचा नमुना (स्वॅब) कोविड परिक्षणास पाठवण्यात आला होता. तो परिक्षण अहवाल प्राप्त होई पर्यंत त्यांनी क्वारंटाईन गृहात राहणे बंधनकारक आहे. याची त्यांना सरकारी वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी यांनी आदेशीत केले होते. तरीही त्या दोघांनी दि. 04.07.2020 रोजी मध्यरात्री विनापरवाना क्वारंटाईन गृह सोडून निघुन गेले. यावरुन ग्रामीण रुग्णालय, भुम येथील डॉ. संदीप जोगदंड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्या दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 34 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना  नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 05.07.2020 रोजी नोंदवला आहे.मोटार वाहन कायदा उल्लंघन: 360 कारवाया- 77,400 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.
उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 04/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 360 कारवाया करुन 77,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.

No comments