उस्मानाबाद : लाच घेताना शहर पोलीस स्टेशनचा एक पोलीस नाईक जाळ्यातउस्मानाबाद  - तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक आतिष दशरथ सरफाळे यास  उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ( एसीबी )पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार हे शेती व्यवसाय करत असून शेतीच्या बांधाच्या कारणावरून चुलत भावाशी झालेल्या भांडणात जखमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटल,उस्मानाबाद येथे उपचारासाठी ऍडमिट होते.तेथील चौकीत कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक आतिष दशरथ सरफाळे, ब.नं.1382, उस्मानाबाद सिटी पो. स्टे. यांनी तक्रारदाराचा चांगला जबाब घेण्यासाठी व डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेऊन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 5000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 3000/- घेण्याचे मान्य केले.

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, उस्मानाबाद येथे तक्रार दिल्यानंतर लोकसेवक यांस दि.30/7/2020 रोजी सिटी हॉटेल, उस्मानाबाद येथे 3000/- रुपये लाच म्हणून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला प्र वि औरंगाबाद व प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक, ला प्र वि उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पो नि अशोक हुलगे, पो.ह. रवींद्र कठारे,पो. ना. मधुकर जाधव,अर्जुन मारकड  पो. शि. विष्णू बेळे, समाधान पवार,महेश शिंदे व चालक ज्ञानदेव कांबळे यांनी केली.

No comments