परंडा ; आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, परंडा: श्रीमती वर्षा पंकज काळे, वय 27 वर्षे, रा. नालगांव, ता. परंडा यांनी दि. 24.07.2020 रोजी 17.45 वा. सु. आपल्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावरुन पोना- विशाल खोसे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वर्षा काळे यांच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 309 अन्वये गुन्हा दि. 25.04.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

सुनेचा छळ, गुन्हा दाखल

पोलीस ठाणे, शिराढोण: सुन- रेश्मा इरफान शेख, रा. बोरगांव (राजे), ता. कळंब यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता 1)इरफान महेबुब शेख (पती) 2) मुमताजबी महेबुब शेख (सासु) 3)इम्रान शेख (दिर) 4)शाहरुख शेख (दीर) 5)गुंडू शेख, सर्व रा. बोरगांव (राजे) या सर्वांनी सुन- रेश्मा यांना सन- 2017 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास दिला. अशा मजकुराच्या रेश्मा शेख यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 498 (अ), 494, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 24.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments