उमरगा : किरकोळ कारणावरून मारहाण

उमरगा: रवी संतराम नरवटे, रा. कुन्हाळी, ता. उमरगा यांनी दि. 29.07.2020 रोजी सायंकाळी गावातीलच लक्ष्मीकांत पाटील यांच्या घरा समोरुन भरधाव वेगात मोटारसायकल चालवत नेल्याने लक्ष्मीकांत पाटील यांनी त्यास हटकले होते. याचा राग मनात धरुन रवी नरवटे याने महेश नरवटे, तुळशीराम मुटले, ब्रम्हानंद मुटले, रतन कुकूर्डे, कुलदीप भोगीले, आकाश भोसले, प्रकाश कुकूर्डे अशा 8 जणांनी लक्ष्मीकांत पाटील यांना दि. 30.07.2020 रोजी 07.30 वा. गावातील शेत रस्त्यावर आडवून काठीने मारहाण करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या लक्ष्मीकांत पाटील यांच्या प्रथम खबरेवरुन नमूद 8 आरोपींविरुद गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments