उमरगा : शेतीतील खड्ड्यात पडून तीन लहान मुलांचा मृत्यूउमरगा: उमरगा तालुक्यातील तलमोड येथे शेतातील खड्ड्यात पडून तीन लहान मुलांचा दुर्दवी मृत्यू झाला. याप्रकरणी एका कंपनीच्या मालक, व्यवस्थापकांविरुद्ध तसेच शेतमालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 उमरगा तालुक्यातील मौजे तलमोड येथील शेत सर्वे क्र. 71 / 72 मध्ये 1)पीबीएआय या कंपनीचे मालक 2)प्रकल्प व्यवस्थापक- धर्मेद्र कुमार 3)उप व्यवस्थापक- प्रमोद चांडके 4) पर्यवेक्षक- भगवान चव्हाण 5) शेत मालक- विनोद मनोहर मोरे, रा. तलमोड यांनी विनोद मोरे यांच्या नमूद शेतातील डोंगर खोदुन मोठा खड्डा तयार केला. त्या खड्ड्यास कोणत्याही प्रकारची सुरक्षेबाबतची उपाययोजना न करता, सुचन फलक न लावता तो खड्डा न बुजता तसाच ठेवल्याने त्यात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे दि. 30.07.2020 रोजी 16.00 वा. सु. संतोष हेमला राठोड, रा. दयानंद नगर, कोळसुर (क.) तांडा, ता. उमरगा यांची मुलगी- अंजली संतोष राठोड, वय 12 वर्षे, भाची- प्रतिक्षा मधुकर पवार, वय 10 वर्षे, व भाचा- ओमकार राजुदास पवार, वय 11 वर्षे हे तीघेही त्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याने बुडून गुदमरुन मयत झाले. अशा मजकुराच्या संतोष राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 5 आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 304, 34 अन्वये गुन्हा दि. 30.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments