Header Ads

कोरोना निवारणार्थ होम-हवन करणाऱ्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल
 तुळजापूर: कोरोनाचे निवारण   होण्यासाठी तुळजापुरात  दोन दिवसीय मन्युसुक्त होम- हवनाचे आयोजन करणाऱ्या पुजाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात  सपना माळी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. 

नागेशशास्त्री विठ्ठलशास्त्री नंदीबुवा अंबुगले, रा. रावळ गल्ली, तुळजापूर यांनी कोरोना महामारी निवारणार्थ दोन दिवसीय मन्युसुक्त होम- हवनाचे आपल्या राहत्या घरी दि. 15 व 16.05.2020 आयोजन केले होते. या वेळी नाका- तोंडास मास्क लावण्यात आले नाही. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालनही करण्यात आले नाही. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 संसर्गाची शक्यता निर्माण होण्याची निष्काळजीपणाची कृती जाणीवपुर्वक करुन विविध मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पो.ठा. तुळजापूर चे पोना- रवी भागवत यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्‍यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.

यासंदर्भात सामाजिक युवा कार्यकर्त्या सपनाताई माळी यांनी उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी त्याची दाखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. 

No comments