Header Ads

आरळी (ब्रु ) मध्ये शेतीच्या वादावरून डबल मर्डरतुळजापूर - तालुक्यातील आरळी (ब्रु ) येथे शेतीच्या वादातून डबल मर्डर झाला आहे. चुलत्याने दोन पुतण्याच्या डोक्यात पाठीमागून खोऱ्याने हल्ला करून दोघांची क्रूरपणे हत्या केली आहे.तालुक्यातील आरळी ब्रु येथे दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 6 : 30 सुमारास शेतीच्या जुन्या वादातून  सुरेश यादव (वय 55)  यांनी पुतणे रमेश विठोबा यादव (वय 47 ) व गणेश गोविंद यादव ( वय 29)  यांच्या डोक्यात शेती कामात वापरण्यात येणारे अवजार खोऱ्याचा वापर करत डोक्यात पाठीमागून वार करून ठेचून क्रूरपणे हत्या करून आरोपी सुरेश यादव व त्याचा मुलगा संभाजी सुरेश यादव वय 21 हे दोघेही फरार झाले आहेत.आरळी ब्रु  येथे शेतीच्या वादातून हे हत्याकांड घडले आहे,सततच्या शेती वादाचा परिणाम हा दोन व्यक्तीच्या  हत्या करण्यापर्यत झाला आहे.,घटनेची माहिती मिळताच  उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे,नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश राऊत,ईटकळ आऊट पोस्टचे सातपुते यांच्यासह गावचे पोलीस पाटील युवराज पाटील,उपसरपंच व्यंकट पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष किरण व्हरकट ,सुनील पारवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या हत्याकांडामुळे आरळी व परिसर हादरून गेला आहे.

 शेतातील बांध फोडल्याचा जाब रमेश विठ्ठल यादव, वय 49 वर्षे, रा. आरळी (बु.), ता. तुळजापूर यांनी भाऊबंद- सुरेश विश्वनाथ यादव यांना दि. 02.07.2020 रोजी 18.30 वा. सु. मौजे आरळी (बु.) शेत गट क्र. 355 मधील शेतात विचारला. त्यावर चिडून जाउन सुरेश यादव यांचा मुलगा- संभाजी याने रमेश यादव यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारल्याने ते जमीनीवर कोसळले असता सुरेश यांची पत्नी- चंद्रकला यांनी रमेश यांच्या डोके पायाने दाबले आणि सुरेश यादव यांनीही लोखंडी फावडे रमेश यांच्या डोक्यात, पायावर मारुन त्यांना ठार मारले. ही हकीकत समजताच भाऊबंद- गणेश गोविंद यादव, वय 35 वर्षे हे तेथे येउन रक्तबंबाळ असलेल्या रमेश यादव यांस उचलन्याचा प्रयत्न करत असतांना सुरेशव संभाजी या दोघा पिता- पुत्रांनी गणेश यादव यांनाही लोखंडी फावड्याने मारहाण करुन जिवे ठार मारले. गणेश यांस वाचवण्यास त्यांचे वडील- गोविंद यादव आले असता त्यांनाही ठार मारण्याच्या उद्देशाने नमूद पिता- पुत्रांनी फावड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या महेश गोविंद यादव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघा आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 302, 307, 34 अन्वये गुन्हा दि. 03.07.2020 रोजी नोंदवला आहे.

उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा.. 

Osmanabad Live New App

No comments