चिवरीचे मंदिर उघडे ठेवून भाविकांची गर्दी जमवली ; दोन पुजाऱ्यावर गुन्हा दाखल
नळदुर्ग: लॉकडाऊन असताना चिवरीचे महालक्ष्मी मंदिर उघडे ठेवून भाविकांची गर्दी जमवली प्रकरणी दोन पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन दिगंबर काळजाते व इराप्पा दिगंबर काळजाते दोघे रा. चिवरी, ता. तुळजापूर यांनी दि. 14.07.2020 रोजी दुपारी 03.30 वा. सु. मौजे चिवरी येथील महालक्ष्मी मंदीर उघडे ठेउन मंदीरात भावीकांची गर्दी निर्माण केली. अशा प्रकारे त्यांनी कोविड- 19 संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण करुन प्रशासनाच्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पो.ठा. नळदुर्ग चे पोना- संतोष सोनवणे यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे गुन्हा दि. 15.07.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.

1 comment

AMBADAS V GORE said...

अशा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणतेही पाऊल उचलणे उचीत आहे.
शासनाचे आदेश पायदळी तुडवून माणसाला रोगराई पासून धोका निर्माण करणे योग्य नाही.