Header Ads

अल्पवयीन मुलीचे अपहरण आंबी: एका 14 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि. 07.07.2020 रोजी 23.00 वा. सु. तीच्या राहत्या घरुन एका तरुणाने (नाव- गाव गोपनीय) लग्नाचे अमिष दाखवून अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणांविरुध्द गुन्हा दि. 08.07.2020 रोजी नोंदवला आहे.

चोरी.
पोलीस ठाणे, ढोकी: पंडीत विश्वनाथ जाधव, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांनी त्यांची सुजुकी मो.सा. क्र. एम.एच. 30 एझेड 2724 ही दि. 06.07.2020 रोजी रात्री 00.30 वा. च्या सुमारास आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती मो.सा. त्यांना सकाळी लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या पंडीत जाधव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्‍द गुन्हा दि. 08.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, आनंदनगर: ऋषीकेश धुमाळ, रा. काकानगर, उस्मानाबाद यांनी दि. 04.06.2020 रोजी 21.00 वा. सु. त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 4417 ही आपल्या राहत्या घरा समोर लावली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, बेंबळी: महादेव बाबुराव नावडे, रा. महादेववाडी, ता. उस्मानाबाद यांच्या महादेववाडी येथील पत्रा शेडची जाळी दि. 07.09.2020 रोजी मध्य रात्री अज्ञात चोरट्याने कापून शेडमधील शेळ्यांच्या कळपातील 8 बोकड (किं.अं. 48,000/-रु.) चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या महादेव नावडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दि. 09.07.2020 रोजी नोंदवला आहे.


अपघात: वृध्दाचा मृत्यु.
पोलीस ठाणे, ढोकी: रामभाऊ पांडुरंग खरात, वय 70 वर्षे, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे दि. 07.07.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे तरे- पळसप रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 1419 ही चालवत जात होते. दरम्यान गावातीलच  चालक- विकी महेंद्र धुमाळ याने वाहन क्र. एम.एच. 11 बीबी 7575 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून रामभाऊ चालवत असलेल्या मो.सा. ला जोराची धडक दिली. या अपघातात रामभाऊ हे वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले आहेत. अशा मजकुराच्या अनिल रामभाऊ खरात यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद वाहन चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा दि. 08.07.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments