Header Ads

पोलीस पाटलांच्या कर्तव्यात अडथळा, गुन्हा दाखलनळदुर्ग: मौजे धनगरवाडी, ता. तुळजापूर येथे गावातील शेतरस्ता व शिवरस्ता या कारणावरुन दोन गटांत वाद झाला होता. याची खबर पोलीस पाटील- विठ्ठल हनुमंत घोडके, रा. धनगरवाडी, ता. तुळजापूर यांनी पोलीस ठाण्यास कळवली होती. याचा राग मनात धरुन गावकरी- अमोल बबन घोडके, बळीराम देवराव घोडके, गणेश दुधभाते, खंडु घोडके अशा चौघांनी दि. 06.07.2020 रोजी 21.30 वा. सु. मौजे धनगरवाडी येथे विठ्ठल घोडके यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुरा विठ्ठल घोडके यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद चौघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 353, 332, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. 07.07.2020 रोजी नोंदवला आहे.

जुगार प्रतिबंधक कारवाया.
पो.ठा., आनंदनगर: पंडीत गुणवंत कांबळे, रा. सेवालाल कॉलनी, उस्मानाबाद हे दि. 07.07.2020 रोजी बालाजी पान टपरी, उस्मानाबाद येथे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवित असतांना कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 230/-रु. सह पो.ठा. आनंदनगर यांच्या पथकास आढळले.
पो.ठा., तामलवाडी: 1)युनूस जलील शेख 2)गवस जहागीरी बेगडे 3)रमजान करिम पटेल 4)सद्दाम शेख 5)दिपक करळे, सर्व रा. तामलवाडी, ता. तुळजापूर हे सर्व दि. 07.07.2020 रोजी रहिमीयॉ शेख यांच्या शेतातील शेड जवळ तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्य, 3 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण 8,880/-रु. सह पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळले.
यावरुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.


अवैध मद्य प्रतिबंधक कारवाई.
पो.ठा., ढोकी: अनुसया विनायक पवार, रा. आरणी लमाण तांडा, ता. उस्मानाबाद या दि. 07.07.2020 रोजी आरणी लमाण तांडा येथे दारुचा अवैध विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळल्या. पोलीसांची चाहुल लागताच अनुसया पवार या घटनास्थळावरुन पळून गेल्या. पथकाने घटनास्थळावरील देशी- विदेशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 1,416/-रु.) जप्त केल्या आहेत. यावरुन नमूद आरोपीविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मोटार वाहन कायदा उल्लंघन: 354 कारवाया- 74,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्हयातील 18 पोलीस ठाणी व शहर वाहतुक शाखा यांनी दि. 07/07/2020 रोजी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द 354 कारवाया करुन 74,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसूल केले आहे.

No comments