ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी धनंजय हुबे यांची निवडउस्मानाबाद - ऑल  इंडिया पॅंथर सेनेच्या  जिल्हाध्यक्षपदी धनंजय हुबे यांची निवड करण्यात आली आहे.  इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकजी केदार यांच्या आदेशाने महाराष्ट्र महासचिव विनोद भोळे  यांनी ही नियुक्ती केली आहे. 

ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचाराच्या विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांवरच ही संघटना काम करत आहे.

धनंजय हुंबे यांच्या सामाजिक राजकीय कार्याची दखल घेत ही निवड झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील युवकांनी या नियुक्तीचे  स्वागत केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

No comments