कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात २ जुलै रोजी ११ पॉजिटीव्हउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील  अकरा  जणांचा कोरोना रिपोर्ट  आज  पॉजिटीव्ह आला आहे. त्यात उमरगा तालुक्यातील सात, तुळजापूर तालुक्यातील दोन, परंडा तालुक्यातील एक  आणि भूम तालुक्यातील एक असा  समावेश आहे.


आज २ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातून १४१  स्वाब लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी अकरा पॉजिटीव्ह, सात अनिर्णित  आणि  १२३  निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत.


पॉजिटीव्ह रुग्ण खालील प्रमाणे आहेत. 

एक रुग्ण नालगाव ता. परांडा ( पूर्वीच्या पॉसिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील )

एक रुग्ण लक्ष्मीनगर भूम ( पूर्वीच्या पॉसिटीव्ह रुग्णाच्या च्या संपर्कातील )

सात रुग्ण हे उमरगा तालुक्यातील आहेत. त्यापैकी एक कसगी, एक रुग्ण गुगळगाव व पाच रुग्ण  हे उमरगा शहरातील आहेत. सात पैकी  सहा  जण उमरग्यातील प्रायव्हेट रुग्णालयातील कर्मचारी आहेत.

.एक रुग्ण  खडकी तांडा ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या च्या संपर्कातील आहे व एक रुग्ण  प्रॉपर तुळजापूर येथील आहे.

उस्मानाबाद लाइव्ह वरील बातम्या जलद गतीने वाचण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह अँप डाऊनलोड करा.. 
Osmanabad Live New App

उस्मानाबाद जिल्ह्यात

कोरोना बाधित रुग्ण - २४६ 
बरे झालेले रुग्ण - १७८ 
मृत्यू - १२ 
ऍक्टिव्ह रुग्ण - ५६ 1 comment

Unknown said...

ओमेरगा रुग्णांची नावे काय आहे